Jalgaon Crime Watemelon Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon Crime: १५ टरबुज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखात फसवणूक

१५ टरबुज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखात फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

अडावद (जळगाव) : अडावद (ता. चोपडा) आणि परिसरातील रुखनखेडे, वडगांव, अडावद, चांदसणी– कमळगांव परिसरातील (Watermelon) टरबुज उत्पादक १५ शेतकऱ्याची (Farmer) सुमारे ३५ लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अडावद पोलीस (Police) ठाण्यात दिल्ली व राजस्थान येथील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

अडावद परिसरातील चांदसणी, कमळगांव, प्रिपी, वडगांव, लोणी, पंचक, धानोरा परिसरात सुमारे १५० हेक्टर टरबुज लागवड करण्यात आली होती. दिल्ली व राजस्थान या ठिकाणाहून टरबुज खरेदी करण्यासाठी व्यापारी अडावद येथे आले होते. सुरुवातीला रोखीने खरेदी करत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. नंतर उधारीवर सुमारे ३५ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे टरबुज खरेदी केल्यापासून व्यापारी फरार झाले.

१५ शेतकऱ्यांची फसवणूक

अडावदसह पंचक्रोशीतील पंधरा शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सुमारे ३५ लाख ६२ हजार रुपये फसवणूक करून व्यापारी फरार झाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असुन काही शेतकर्यांनी व्याजाने पैसे काढून टरबुजाची लागवड केली होती. या व्यापाऱ्यांशी संपर्क होत नसल्‍याने समाधान धनगर (कमळगांव) यासह पंधरा शेतकऱ्यांनी अडावद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नदीम कुरेशी व सिरा जोदीन यांच्या विरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा उपनिरीक्षक चंदकांत पाटील करित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT