Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जबाजारी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; आठवडाभरात तिसरी घटना

Jalgaon News : पत्नी, मुलगा, मुलगीसह शेती करीत होते. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असल्याने यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते

Rajesh Sonwane

जळगाव : डोक्यावर असलेले कर्ज फेडीच्या विवंचनेत शेतकरी टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवीत आहेत. मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील एका शेतकऱ्याने कर्ज फेडीच्या विवंचनेत आत्महत्या केली.  

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) येथील गौतम श्रीराम हिरोळे (वय ३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Muktainagar) गौतम हिरोळे आई, पत्नी, मुलगा, मुलगीसह शेती करीत होते. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असल्याने यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. दरम्यान शेतीसाठी त्यांनी विविध खासगी फायनान्स संस्थांकडून (farmer) कर्ज घेतले होते. परंतु शेतीतून चांगले उत्पन्न न मिळाल्याने कर्ज कसे फेडता येईल, या विवंचनेत ते होते. 

यातूनच त्यांनी २३ जुलैला शेतात विषारी द्रव प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली असता त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गौतम यांना (Jalgaon) जळगाव जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. गेल्या चौदा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT