Akkalpada Dam : अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग; पांझरा नदीत २५०० वेगाने विसर्ग

Dhule News : अक्कलपाडा धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे
Akkalpada Dam
Akkalpada DamSaam tv
Published On

धुळे : धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसात जोरदार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात केली आहे. पांझरा नदीत २५०० क्युसेक वेगाने विसर्ग होत असल्याने पांझरा नदीला देखील मोठा पूर आला आहे.

Akkalpada Dam
Sambhajinagar News : एनओसीसाठी दीड लाखाची लाच; मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यासह लिपिक निलंबित

अक्कलपाडा धरण (Akkalpada Dam) पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामुळे आता अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी (Panjhara River) पात्रात कालपासून पाण्याचा विसर्ग हा करण्यात येत असून पाऊस कमी झाल्यानंतर आता धरणातील आवकही कमी झाली आहे. आता पांझरा नदीपात्रात अक्कलपाडा धरणामधून करण्यात येणारा विसर्ग हा कमी करण्यात आला असून, 2500 क्युसेस वेगाने सध्या अक्कलपाडा धरणातून पांजरा नदी पात्रात विसर्ग होत आहे.

Akkalpada Dam
Pimpri Chinchwad News : इंद्रायणी नदीपात्रातील बेकायदा बंगले पाडणार; सुप्रीम कोर्टाकडून निर्णय कायम

निम्म्याने विसर्ग केला कमी 

धुळे (Dhule) जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ५ जुलैला पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज देखील हा विसर्ग सुरूच आहे. पांझरा नदीपात्रात करण्यात येत असलेला विसर्ग आता कालच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. ५ जुलैला ५ हजार ७५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग अक्कलपाडा धरणातून करण्यात येत होता. परंतु आज दुपारनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असून आता सध्या २५०० क्युसेक वेगाने पांझरा नदी पात्रामध्ये करण्यात येत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com