Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

साम टिव्ही ब्युरो

जामनेर (जळगाव) : कापसाला भाव नसल्याने देवळसगाव येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) घेतलेले बँकांचे कर्ज वेळेत फेडता येत नसल्याने विषारी पदार्थाचे सेवन करून आपल्या शेतातच (Jalgaon News) आपली जीवनयात्रा संपविली. गोपाळ नारायण राजपूत (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

देवळगाव (ता. जामनेर) येथील गोपाळ राजपूत यांच्या नावावर अडीच- तीन एकर शेतजमीन आहे. त्यामध्ये सध्या कपाशी लागवड केली असून, आधीच्या वेचणी झालेल्या कपाशीला बाजारात पुरेशा प्रमाणात भाव मिळत नाही. तर दुसरीकडे अस्मानी संकट अशा दुहेरी संकट आहे. भाव मिळत नसल्‍याने कापूस घरातच पडून आले. कापूस (Cotton) विकला जात नसल्‍याने पैसा हातात नाही.

चार लाखाचे कर्ज

या अशा विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरील तीन ते चार लाखांपेक्षा अधिकच्या कर्जाची वेळेच्या आत परतफेड करता आली नाही, परिणामी शेतकरी गोपाळ राजपूत यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि आपली जीवनयात्रा संपविली. मृत गोपाळ यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

पंकजा-धनंजय मुंडे १५ वर्षांनी एकत्र, परळी नगरपरिषदेसाठी युती निश्चित? VIDEO

Heart Attack: पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर मिळतात हार्ट अटॅकचे संकेत, वेळीच बदल ओळखा

Mumbai Shocking : मुंबईची पहिली भेट अखेरची ठरली; उंच इमारतीवरून सळई कोसळून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Accident: घराकडे जाताना भयंकर घडलं, भरधाव वाहनाने ३ जिवलग मित्रांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT