Dharangaon News Saam tv
ऍग्रो वन

Dharangaon News : कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Jalgaon News : शेती करून ते उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान पवार यांनी यंदा त्यांच्या शेतीसह इतरांची शेती कसण्यासाठी घेतली होती. शेतीसाठी त्यांनी कर्ज काढले होते

Rajesh Sonwane

धरणगाव (जळगाव) : शेतीसाठी कर्ज घेतले असताना शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते फेडू शकत नाही. या विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची घटना कवठळ (ता. धरणगाव) येथे समोर आली. शेतात जाऊन या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेतिला.  सदरची घटना २५ जुलैला सकाळी उघडकीस आली. 

धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील कवठळ येथील शेतकरी शरद खंडू पवार (वय ५७) यांनी आत्महत्या केली. शरद पवार हे पत्नी, दोन मुले व सुना यांच्यासोबत गावात वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान पवार यांनी यंदा त्यांच्या शेतीसह इतरांची शेती कसण्यासाठी घेतली होती. शेतीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. डोक्यावर कर्ज असताना पावसाच्या लहरीपणातून चांगले उत्पन्न येण्याची शक्यता नव्हती. कर्जबाजारीपणामुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते. 

दरम्यान गुरुवारी सकाळी नऊला चहा घेऊन ते घरून शेतात गेल्यावर त्यांनी गळफास घेतला. त्यांचा मुलगा मयूर पवार हा साडेदहाच्या सुमारास शेतात गेला असता त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी (Farmer) शेतातील मजुरांना बोलविले. त्यांना खाली उतरवून तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुग्गड यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत धरणगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मतदानानिमित्त मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT