Chalisgaon News Saam tv
ऍग्रो वन

Chalisgaon News : परतीच्या पावसाने मक्याचे नुकसान; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : यंदाचा पावसाळा नुकसानकारक ठरला आहे. अगदी सुरवातीपासूनच जोरदार पावसाळा सुरवात झाल्यानंतर अधूनमधून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत होता

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : यंदाच्या हंगामात शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात परतीचा पाऊस देखील जोरदार बरसल्याने  पावसामुळे मक्याचे नुकसान झाले. शिवाय त्यात कपाशीला देखील भाव मिळत नसल्यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्याने घरातच वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

चाळीसगाव (Chalisgaon News) तालुक्यातील तिरपोळे येथील चंद्रसिंग पंडित जाधव (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. यंदाचा पावसाळा नुकसानकारक ठरला आहे. अगदी सुरवातीपासूनच जोरदार पावसाळा सुरवात झाल्यानंतर अधूनमधून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत होता. शेतातील पिके देखील पुरामुळे पाण्याखाली गेली होती. यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्याचे (Farmer) आर्थिक गणित कोलमडले आहे. याशिवाय शेतातून आलेल्या मालाला देखील चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश आहे. 

चंद्रसिंग जाधव यांनी आपल्या शेतात मक्याची लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात कपाशीला भाव नसल्याने जाधव हताश झाले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान चंद्रसिंग जाधव हे ५ नोव्हेंबरला पहाटे चारच्या सुमारास घरच्यांना घरात आढळून आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, घराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असलेल्या खोलीतच त्यांनी वायरच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत शेखर जाधव याने दिलेल्या माहितीवरून येथील पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT