Amalner News Saam tv
ऍग्रो वन

Amalner News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : जितेंद्र शिसोदे हा पत्नी, २ मुले, २ भाऊ परिवारासह डांगरी गावात वास्तव्यास होता. शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करीत होता.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे शेतकऱ्याने पीककर्ज फेडता न आल्याच्या (Jalgaon) विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस (Police) स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील जितेंद्र शांताराम शिसोदे (वय ४२) असे शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. जितेंद्र शिसोदे हा पत्नी, २ मुले, २ भाऊ परिवारासह डांगरी गावात वास्तव्यास होता. शेतीकाम करून तो उदरनिर्वाह करीत होता. गेल्या अनेक दिवसांपासून घेतलेल्या पीक कर्ज कसे फेडता येईल या विवंचनेत तो होता. त्यातूनच त्याने २६ डिसेंबरला राहत्या घरी दुपारी छताला साडीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृतदेह ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे नेण्यात आला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पाटील यांनी व मारवड पोलिसांनी धाव घेत घटनेची माहिती जाणून घेतली. मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना सुनील तेली करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: भारतात दिसणार पहिलं चंद्रग्रहण कधी? धार्मिक नियम आणि सूतक काळ जाणून घ्या

Maharashtra Live News Update : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रोखलं

खूशखबर! भारतात ई-पासपोर्ट लाँच; फी किती भरावी लागेल आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये हफ्ता मिळणार, मंत्र्याचं मोठं विधान

Children diabetes risk: गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका; चुकीच्या आहाराच्या सवयी पालकांनी कशा बदलाव्या?

SCROLL FOR NEXT