Amalner News Saam tv
ऍग्रो वन

Amalner News: गळफास घेत शेतकऱ्याने संपविले जीवन

गळफास घेत शेतकऱ्याने संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : ढेकूसिम (ता. अमळनेर) येथील एक शेतकऱ्याने (Farmer) गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. यामुळे परिसरात (Amalner) हळहळ व्यक्त होत आहे. (Tajya Batmya)

अगोदरच बेमौसमी पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्येने समाजमन हेलावत आहे. ढेकूसिम (ता. अमळनेर) येथील शेतकरी राजेंद्र नगराज पाटील (वय ५०) यांनी गुरुवारी पहाटेच्‍या सुमारास शेतातील खळ्यात बांधलेल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब गुरुवारी पहाटे ४ वाजता उघडकीस आली.

या घटनेबाबत अमळनेर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT