केळी उत्पादकांवर शेतात मेंढ्या सोडण्याची वेळ मंगेश गाडे
ऍग्रो वन

केळी उत्पादकांवर शेतात मेंढ्या सोडण्याची वेळ

कोरोना महामारीच्या लॉकडाऊनचा मोठा फटका फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला असून यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश गाडे

जुन्नर: कोरोना महामारीच्या (Coronavirus) लॉकडाऊनचा (Lockdown) मोठा फटका फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला असून यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे (Farmer) मोठे नुकसान झाले. या वर्षी केळीला बाजारभावच मिळत नसल्याने जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावचे शेतकरी राजाराम भुजबळ या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्या दिड एकर केळीच्या क्षेत्रात केळी तोडून टाकुन त्यात मेंढ्या सोडण्याची आज वेळ आली आहे.

भुजबळ यांनी दोन वर्षां पुर्वी आपल्या दिड एकर शेतात तीन हजार केळीच्या रोपांची लागवड केली होती. परंतु, मागील वर्षी निसर्ग चक्री वादळाने केळीची पुर्ण बाग भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान त्यांना सहन करावे लागले होते. या वर्षी तरी केळी पिकातून चांगला नफा मिळेल या आशेने त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खर्च करून केळीची बाग उत्तम राखली. परंतू यंदाही कोरोना महामारीच्या लॉकडाऊन मुळे केळीला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने त्यांना शेतातच केळीचे पिक तोडून फेकून देऊन त्या शेतात चरायला मेंढ्या सोडून देण्याची वेळ आल्याने भुजबळ यांना यंदाही केळी पीकात लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

SCROLL FOR NEXT