Buldhana News Saam Tv
ऍग्रो वन

हिरवी मिरची आणि लिंबूला महागाईची "नजर"!

खामगावात 20 रुपयांत 3 लिंबू; मिरची 120 रुपये किलो

संजय जाधव

बुलढाणा - वाढत्या महागाईने जनतेचे बजेट बिघडवलंय. महागाईचा चटका सर्वांनाच बसत आहे. आतापर्यंत दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी लोक हैराण झाली होती. मात्र आता हिरवी मिरची आणि लिंबाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे उन्हाळ्यात लोकांचे हाल झाले आहेत. उन्हाळ्यात जिथे लोकांना लिंबाची सर्वाधिक गरज असते तिथे महागाईमुळे सर्वसामान्यांना लिंबू खरेदी करणे कठीण झाले आहे.

हे देखील पाहा-

पेट्रोलच्या दरांसोबतच भाजीपाल्याचे दरही वाढले असून, लिंबू 650 रुपये शेकडा तर, मिरची 100 रुपये किलोने बाजारात मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खर्च अधिक वाढला आहे. पेट्रोल 120 रुपयांच्या वर पोहोचले आहे. त्याचा परिणाम महागाई वाढीवर होत आहे. उन्हाची तिव्रता वाढल्याने लिंबूला अधिक मागणी आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे 20 रुपयांचे तीनच लिंबू मिळतात.

तर मिरची 25 ते 30 रुपये पावशेर या भावाने विकली जात आहे. या तुलनेत कांदे व बटाट्याचे दर सर्वात कमी दिसून येतात. साधारणत: 20 रुपये किलोने किरकोळ बाजारात विक्री होत आहे. वांगे ६० रुपये किलो, काकडी १५ रुपये किलो, भोपळा २० रुपयांना मिळत आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसते. कोथिंबिर २० ते ३० रुपये जुडी, मेथी, पालक, शेपू या २० रुपये जुडी प्रमाणे मिळत आहेत. बाजारात पालेभाज्यांची आवक वाढत असल्याने त्याचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT