मावळ ब्रॅंड ‘इंद्रायणी’ची गोडी कायम दिलीप कांबळे
ऍग्रो वन

मावळ ब्रॅंड ‘इंद्रायणी’ची गोडी कायम

मावळात अनेक शेतकऱ्यांनी टोकन पध्दतीने केली भाताची लागवड ठरत आहे फायदेशीर

दिलीप कांबळे

मावळ : टोकन पद्धतीने भाताची लागवड केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची, मजुरीची आणि खर्चाची बचत झाली आहे. तसेच आता उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे टोकन पध्दतीने भाताची केलेली लागवड फायदेशीर ठरत असल्याचे चित्र सध्या मावळ मध्ये दिसून येत आहे. इंद्रायणी भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या मावळात अनेक शेतकरी पारंपारिक पद्धतीने भाताची लागवड करत आहेत.

हे देखील पहा-

मात्र, या वर्षी टोकन पद्धतीने भात शेती करत असल्याचे मावळ मधील हे पहिलेच उदाहरण आहे. मावळ मधील सूदवडी येथील प्रयोगशील शेतकरी गोरक्षनाथ काळे हे पारंपरिक पद्धतीने भात शेती करत होते. मात्र, या वर्षी पहिल्यांदाच टोकन पध्दतीने भातशेती केली आहे. गोरक्षनाथ हे आपला वकिलीचा व्यवसाय सांभाळून शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. यासाठी त्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे.

कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ येथील एका संशोधकाच्या मदतीने टोकन पद्धतीने २ एकर क्षेत्रात इंद्रायणी जातीच्या भाताची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी यांत्रिक पद्धतीचाही वापर केलेला आहे. आता पीक जोमाने वाढले आहे. सध्या हे पीक तयार झाले असून येत्या काही दिवसांत काढणीसाठी तयार होणार आहे. पारंपरिक पद्धतीने केलेल्या भात लागवडीस मोठा खर्च करावा लागतो. तसेच मजूर टंचाईमुळे तर शेतकऱ्यांना कामे करताना कसरत करावी लागते. परंतु, टोकन पध्दतीने केलेल्या या भातशेतीमुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळण्याची आशा आता या शेतकऱ्यांना आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला एसटी बसमधून प्रवास

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे 'हे' ५ पदार्थ, हेल्दी समजून खाण्याची चूक करू नका

Ragda Pattice Recipe : ठेलेवाला चाट विसरा! घरच्या घरी बनवा चटपटीत आणि क्रिस्पी रगडा पेटिस

कॅबिनेट मंत्राचा OSD आमदार होणार? उदय सामंतांचा विश्वासू शिलेदार विधान परिषदेच्या रिंगणात

Sambhajinagar : खवड्या डोंगरावरील ३ जणांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण, कुणालच्या मावशीचा गंभीर आरोप, व्हिडीओनं उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT