अकोल्यात वन्यप्राण्यांचा हैदोस; कोवळ्या पिकांची केली नासाडी Saam tv
ऍग्रो वन

अकोल्यात वन्यप्राण्यांचा हैदोस; कोवळ्या पिकांची केली नासाडी

पावसाअभावी जिल्ह्यात आधीच पेरण्या खोळंबल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला : सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवताना शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. त्याचवेळी काटकसर करून कष्टाने जगविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. अकोल्यातील (Akola) अनेक शेतशिवारात कोवळ्या पिकांची हरणे आणि माकडांचे कळपच्या कळप नासाडी करत आहेत. पावसाअभावी जिल्ह्यात आधीच पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यातल्या त्यात ज्या भागात पेरण्या आटोपल्या त्या भागात वन्यप्राण्यांचे कळपच्या कळप सोयाबीन, तूर , कपाशी पिकांचे कोवळी पिके, बियाणे फस्त करीत आहेत. (In Akola, wild animals are destroying crops)

याबाबत, अकोल्यातील दहिगावचे शेतकरी गजानन पुंडकर माहिती दिली आहे. अकोल्यातील धोतरडी, दहिगाव, रामगाव, सांगळुद भागातील हे चित्र आहे. जिल्ह्यात इतरही ठिकाणी वन्यप्राण्यांचा हैदोस पाहायला मिळतोय. रात्री, अपरात्री रानडुकरे संपूर्ण शिवारात हैदोस घालत आहे. बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहे. मात्र, वन्यप्राणी नासाडी करतात त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी. संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. आधीच गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा फटका बसत आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकारणात मोठी खळबळ

BP Medicines Precautions: ब्लड प्रेशरची रोज गोळ्या घेताय? मग, 'या' ७ गोष्टींची काळजी घ्या

Maharashtra News Live Update: चाकण MIDC च्या विकासासाठी '३-स्तरीय' (Short, Mid, Long term) कृती आराखडा

Paper Dosa Recipe : घरच्या घरी कुरकुरीत पेपर डोसा असा करा तयार; रेस्टॉरंटची चव विसराल!

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! नवजात बाळांना देणार सोन्याची अंगठी; १,२८,४९९ अंगठ्यांची ऑर्डर

SCROLL FOR NEXT