farmer saam tv
ऍग्रो वन

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 'ही' महत्वाची सुविधा झाली बंद

साम टिव्ही ब्युरो

मुंबई - पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Scheme) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेत (PM Kisan Yojana) काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले होते. यातील पहिला बदल म्हणजे योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी (E-Kyc) करणं अनिवार्य करण्यात आलं. तर दुसरा बदल म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार कार्डसोबत (Aadhar Card Link) लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं. ई-केवायसी करण्यासाठी दोन वेळा मुदतही वाढवण्यात आली. मात्र आता ई-केवायसीची प्रमुख सुविधा बंद करण्यात आली आहे.

घरबसल्या करता येत होती ई-केवायसीची प्रक्रिया

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक केलं. शेतकऱ्यांना घरबसल्या ई-केवायसी करता यावी म्हणून तशी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. केंद्राच्या आदेशानंतर अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया घरबसल्या पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण केली. मात्र सरकारकडून ई-केवायसीची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अलीकडेच ही माहिती पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आता ई-केवायसीची प्रक्रिया कशी पूर्ण करता येईल?

आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया केली नाही, अशा शेतकऱ्यांना लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना आता घराबाहेर पडावं लागणार आहे. कारण, आता मोबाइलद्वारे ओटीपी आधारित ई-केवायसीची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.आतापर्यंत मोबाईल फोनद्वारे ओटीपीद्वारे अवघ्या काही वेळात आधार कार्ड क्रमांक टाकून पूर्ण होणारी ही प्रक्रिया आता जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन पूर्ण करावी लागणार आहे.

२२ मे पर्यंत मुदत वाढवली

सुरूवातीला शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत २२ मे २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पीएम किसान पोर्टलवरील अद्ययावत माहितीनुसार, आता ही प्रक्रिया २२ मे २०२२ पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६,००० खात्यात पाठवते. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांच्या तीन टप्प्यात वर्ग केले जातात.

पीएम किसानचा ११ वा हप्ता कधी मिळणार?

या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १० हप्त्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर आता शेतकरी ११ व्या हप्त्याची वाट बघत आहे. माहितीनुसार ११ व्या हप्ताचे पैसे शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीलाच मिळण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT