Hingoli News
Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News: उच्‍चशिक्षीत तरुणाने नोकरी सोडली; ‘एमबीए’चे मॅनेजमेंट शेतीत वापरून लाखोची कमाई

संदीप नागरे

हिंगोली : ग्रामीण भागात सध्या वडिलोपार्जित शेती विक्री करून शहरात व्यवसाय थाटणाऱ्या शेतकरी (Farmer) पुत्रांची संख्या वाढत आहे. मात्र (Hingoli) हिंगोलीत एका उच्चशिक्षित तरुणांने नोकरीला बगल देत शेती पूरक व्यवसायातून रोजगाराची सुवर्णसंधी शोधत लाखोंची कमाई केली आहे. (Letest Marathi News)

हर्षवर्धन पंडित मूळचे हिंगोली जिल्ह्यातील आडगावचे रहिवासी असून, हर्षवर्धन यांचे शिक्षण एमबीए झाले आहे. अजूनही त्यांचे उच्चशिक्षित शिक्षण (Education) सुरूच आहे. पुढेही ते आपलं शिक्षण सुरूच ठेवणार आहेत. मात्र हर्षवर्धन हे उच्चशिक्षित होऊनही त्यांनी इतरांच्या दावणीला स्वतःला बांधून न घेता, मशरूम शेतीचा शेतीपूरक व्यवसाय निवडलाय आणि तो यशस्वी देखील केलाय.

अशी केली मशरूम शेतीची सुरुवात

मशरूमची शेती करण्यासाठी हर्षवर्धन यांनी वडिलोपार्जित तीन एकर शेती वापरात घेतली. या शेतीमध्ये शेड उभारणीसाठी त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब करून पैसे मिळवले आणि काम पूर्ण केले. हर्षवर्धन यांनी मशरूम शेतीसाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणांवरून मशरूमची बिज मागवली. एका बेडमध्ये दहा ग्रॅम बीज टाकत त्याचे नियोजन केले.

आवश्‍यक उपाययोजनाही केली

मशरूमची उगवण 21 ते 24 दिवसांमध्ये झाली. यासाठी शेडमध्ये तापमान 20 ते 30 अंश असणे आवश्यक असल्याने त्यासाठी उपाययोजना केली. मशरूम अधिक दर्जेदार आणि गुणवत्ता पूरक उगवण्यासाठी तापमानातील आद्रता 60 ते 70 ठेवावी लागते. त्यासाठी देखील शेडमध्ये शुगर, सुती पोते लावले. सद्या पंडित यांच्या मशरूम शेतीमध्ये एक किलो बीजपासून 10 किलो मशरूम उत्पादन निघत आहे.

विशेष म्हणजे भारतात मिलकी, बटन, ट्याडीस्ट्रो, ऑइस्टर ह्या जातीचे प्रामुख्याने मशरुम घेतले जाते. तर पंडित यांनी ऑइस्टर जातीचे मागरूम घेतले आहे. या मशरूमची बाराही महिने शेती केली जाते. औषधी व गुणकारी असल्याने आणि विशेष म्हणजे स्थानिक ठिकाणी या मशरूमचे उत्पादन घेतले जात असल्याने, ग्राहकांना ताजे आणि दर्जेदार मशरूम मिळते त्यामुळे या मशरूम ला सर्वाधिक जास्त मागणी असल्याचे पंडित सांगतात,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

Met Gala 2024मध्ये सौंदर्यवतींच्या नजाकती, फॅशनवर खिळल्या नजरा

PM Modi In Beed: गोपीनाथ यांच्यासोबत माझं घनिष्ट नातं, PM मोदींकडून मुंडेंच्या आठवणींना उजाळा

EVM हॅक करण्यासाठी सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा अंबादास दानवेंना फोन; कोण आहे मारूती ढाकणे

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

SCROLL FOR NEXT