Hingoli News Saam tv
ऍग्रो वन

Hingoli News : हिंगोलीत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडलं; तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने शेतकरी आक्रमक

Hingoli News : नवीन खरीप हंगाम सुरु झाल्याने या खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या राज्यभरात शेतकऱ्यांच्या वतीने पिक विमा भरणे सुरू आहे. मात्र पीक विमा कंपनीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण

संदीप नागरे

हिंगोली : शेतकऱ्यांसाठी सरकारने पीक विमा योजना सुरु केली आहे. जेणे करून पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. दरम्यान खरीप हंगामासाठी पीक विमा काढला जात आहे. यासाठी कृषी विभागाकडून देखील आवाहन केले जात आहे. मात्र विमा काढता येत नसल्याने शेतकरी संतप्त असून हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांनी आज पिक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करत हनुमाननगर परिसरात खाजगी जागेत असलेलं पीक विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड केली आहे.  

नवीन खरीप हंगाम (Kharip Hangam) सुरु झाल्याने या खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या राज्यभरात शेतकऱ्यांच्या वतीने पिक विमा भरणे सुरू आहे. मात्र पीक विमा कंपनीच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण असल्याने शेतकऱ्यांचा पिक विमा (Crop Insurance) भरला जात नाही. या समस्येचे निरासन व्हावे, यासाठी शेतकरी या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र विमा कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. 

खुर्च्यांची तोडफोड 

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या समक्ष (farmer) शेतकऱ्यांनी खुर्च्या व फर्निचरची तोडफोड करत नासधूस केली. तसेच पिक विमा कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा रोष पाहून पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Maharashtra Live News Update: शिवसेनेबरोबर आता रायगड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी विरोधात तोंड उघडले

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Shravana Nakshatra : मकर राशीच्या व्यक्तींचे आयुष्य आणि श्रवण नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे करियर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT