हिंगोली : सद्या चारचाकी वाहन घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेक जण आयुष्यात लहान मोठी चार चाकी आपल्या दारात उभी असावी यासाठी स्वप्नही रंगवतात. मात्र सध्या चार चाकी वाहनांचे गगनाला भिडलेले दर पाहून अनेकांचा स्वप्नभंग झालाय. मात्र आपल्या शेतात वर्षानुवर्ष बैलांच्या साथीने उभी असलेली बैलगाडी (Bullock Cart) आधुनिक करण्याचे स्वप्न एका शेतकऱ्याने (Farmer) उराशी बाळगले आणि ते पूर्णही केले. (Letest Marathi News)
हिंगोली (Hingoli) तालुक्यातील लिंबी गावातील अल्पभूधारक शेतकरी शेषराव बोडखे यांनी आधुनिक काळातील गावठी तंत्रज्ञानाने बैलगाडी विकसित केली. नेहमी साध्या सरळ स्वभावाने ओळखले जाणारे शेषराव बोडखे हे पंचक्रोशीसह जिल्हाभरात चर्चेत आलेत. त्याला कारण ठरलय बोडके यांच्या आधुनिक संकल्पनेतून देशी जुगाड (Deshi Jugad) वापरून तंत्रज्ञानाच्या जमान्यात भंगारातील साहित्य एकत्र जमा करून उदयास आलेली गावठी बैलगाडी.
भंगारातून तयार केली बैलगाडी
भंगारात फेकून दिलेल्या वस्तूंना एकत्र जमा करून या शेतकऱ्याने अनोख्या बैलगाडीची निर्मिती केली आहे. या बैलगाडीचा वापर शेतात जाणारे शेतकरी प्रवासी ते मालवाहू असा सुरू असल्याचे शेतकरी बोडखे सांगतात. बोडखे यांनी बनवलेली गाडी ही अनेकांसाठी कुतुहलाचा विषय बनली आहे. अनेक जण शेतात जाताना या गाडीमधूनच प्रवास करत आहेत.
मालही करतात वाहतूक
सकाळी घरी चहापाणी आटोपल्यानंतर शेतात दैनंदिन कामकाजासाठी शेतकरी शेषराव बोडके ही आपली गावठी अँबेसिडर ब्रँड गाडी घेऊन निघतात. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाला ते या गाडीमध्ये मोफत लिफ्ट देतात. दिवसभराचं कामकाज आटोपल्यानंतर शेतामधून घराकडे सुरू होणाऱ्या परतीच्या प्रवासादरम्यान बोडके हे शेतातील उत्पादित केलेल्या मालाची वाहतूक देखील याच गाडीमधून करतात.
रहदारीच्या रस्त्यावर प्रवास टाळतात
सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गाडी सक्षम नसल्याने रहदारीच्या रस्त्यांवर प्रवास करणे बोडके हे टाळतात. शेतात जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा आणि आधुनिक बैलगाडीचे स्वप्न साकार व्हावे; हेच एक ध्येय ही गाडी निर्मिती करण्यामागे असल्याचे बोडके यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.