मुसळधार पावसाचा 34 हजार हेक्टरवरील पिकांना फटका जयेश गावंडे
ऍग्रो वन

मुसळधार पावसाचा 34 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील सुमारे 34 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे Rain अकोला जिल्ह्यातील सुमारे 34 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तर यापैकी 4 हजार 249 हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला अशी माहिती आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.

अकोला जिल्ह्यात 21 जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला या पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यातअतिवृष्टीची नोंद करण्यात आली. मूर्तिजापूर, अकोट, बार्शीटाकळी आणि बाळापूर या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यानंतर 22 जुलैला जिल्ह्यात कोसळधार पाऊस बरसला यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागाला या पावसाचा फटका बसला. जिल्ह्यातील अनेक भागात पिके खरडून जाऊन तूर, सोयाबीन आणि कपाशी सह आदी पीक पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान काल 23 जुलै रोजी दिवसभर पावसाने रिपरिप चालू ठेवली या पावसामुळे जिल्ह्यातील होती नव्हती पिके खराब झाली आहेत.

हे देखील पहा -

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी Heavy rain आणि पुराच्या तडाख्यात खरीप पिकांचे Crop प्रचंड नुकसान झाले. तसेच पुरामुळे नदी-नाल्याकाठची शेतजमीन खरडून गेले आहेत. आधीच अडचणीत असलेला शेतकरी पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीमुळे पुन्हा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नुकसानीचा जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार अकोला, बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात 33 हजार 798 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 4 हजार 249 हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान झाले.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीसह शेतजमिनीचे नुकसान आणि घरांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्याचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान काल पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करून दोन ते तीन दिवसांत मदत देण्याचे आश्वासन दिले. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे Panchnama करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT