Heavy Rains: हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या  Saam Tv
ऍग्रो वन

Heavy Rains: हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं नैराश्यातून शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं मका आणि कापसाचे पीक वाया गेल्यामुळे नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबायचं नाव घेत नाही. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं मका आणि कापसाचे पीक वाया गेल्यामुळे नैराश्यातून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कृषीमंत्र्यांच्या मालेगाव तालुक्यातील देवारपाडे मधील शेतकरी शिवाजी सरोदे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.

हे देखील पहा-

त्यांची अवघी दीड हेक्टर जिरायती शेती आहे. यात त्यांनी खरीपाचे कापूस लागवड आणि मका पेरणी केली होती. दोन्ही देखील पिकं ऐन काढणीवर आलेली असतांना मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या मका आणि कापसाच्या शेतात पूर्णपणे पाणी साचले होते. यामुळे अगदी हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पूर्ण नुकसान झाल्यामुळे ते हताश झाले होते.

एकीकडे पिकांचे नुकसान तर दुसरीकडे हातउसनवारी करून घेतलेलं कर्ज फेडायची चिंता या विवंचनेतून त्यांनी हे मोठे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात शेती आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा तर सुरु आहेत.

मात्र, अद्याप मदत काही मिळायला तयार नाही. ती कधी आणि किती मिळेल, याबाबत देखील निश्चित खात्री नसल्याने हताश बळीराजाकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीच्या केवळ घोषणा नको, तर प्रत्यक्ष मदत करण्याची आणि शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT