पोलीस कर्मचाऱ्याचं 'शेतकरी रडला' गाणं तुफान व्हायरल; पाहा Video Saam TV
ऍग्रो वन

पोलीस कर्मचाऱ्याचं 'शेतकरी रडला' गाणं तुफान व्हायरल; पाहा Video

जालना जिल्ह्यात (Jalna District ) सर्वत्रच मुसळधार पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना जिल्ह्यात (Jalna District ) सर्वत्रच मुसळधार पावसामुळे खरीप पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लाखो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, मका, तूर पिक उध्वस्त झालं आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन, उडीद सारख्या पिकांना शेतात साचलेल्या पाण्यातच कोंब फुटले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून जिल्हयात एकसारखा पाऊस सुरू आहे, त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेवर जालन्यातील घनसावंगी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांचं 'शेतकरी रडला' हे नवीन एक गाणं रिलीज झालं आहे. प्रत्येकाचं हृदय पिळवटून टाकेल असं हे गाणं असून हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. या गाण्याला लाखो लाईक मिळत असून शेतकरी जगवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा असं आवाहन पोलीस कर्मचारी आणि गायक योगेश गायके यांनी केलं आहे.

दरम्यान, मराठवाड्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली या भागात पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी या नुकसानाने पुरता बेजार झाला आहे. काही शेतकऱ्यांचं हाता तोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं आहे. सरकारने सरसकट मदत करावी अशी मागणी शेतकरी आणि विरोधी पक्ष करत आहेत. एका बाजूला कोरोनाचे संकट तर दुसऱ्या बाजूला पावसाने थैमान घातलं आहे. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे, त्याचबरोबर हेक्टरी ५० हजार रुपये मदत करण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कथित कॉल रेकॉर्डिंगनंतर गंगाधर काळकुटे यांची पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव

Actor Abhinay News: प्रसिद्ध अभिनेत्याचं ४४ व्या वर्षी निधन, लिव्हर झालेले निकामी, चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा

MHADA Homes: पुण्यातील हिंजवडी, वाकडमध्ये फक्त २८ लाखात घर; खरं की खोटं? म्हाडाने दिली माहिती

रोड, बुलेट ट्रेन अन् विमानतळालाही जोडणार, Underground road networkला हिरवा कंदील, वाहतूक कोंडीतून सुटका

Reduce Cholesterol Naturally: घाणेरड्या कोलेस्ट्रॉलवर किचनमध्येच रामबाण उपाय, 'या' पदार्थामुळे धमण्या-नसांमधून धावेल १०० च्या स्पीडने रक्त

SCROLL FOR NEXT