Lumpy Skin Disease, Dehu saam tv
ऍग्रो वन

Lumpy Skin Disease : देहूत 'लम्पी' चा प्रादुर्भाव वाढला, दाेन जनावरांचा मृत्यू; लसीकरण पूर्ण : पशुसंवर्धन विभाग

पावसाळा सुरु झाल्यानंतर जनावरांना लम्पीची लागण हाेऊ लागली आहे.

दिलीप कांबळे

Maval News : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या देहूत अनेक जनावरांना लम्पिस्किन विषाणूची (lumpy skin disease) लागण झाली आहे. प्राप्त माहितीनूसार दोन जनावरांचा मृत्यू झाला. परिणामी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Maharashtra News)

लम्पिस्किन विषाणूचा बाह्य कीटकांद्वारे प्रसार होतो. या विषाणूची लागण झाल्याने जनावरांना ताप येऊन दूध उत्पादन घटण्याची शक्यता असते. देहूत जनावरांना तापाची औषध देणे व लसीकरण करणे आवश्यक बनले आहे.

परंतु देहूतील पशुसंवर्धन अधिकारी कधीच उपलब्ध नसल्याने अनेक जनावरांमध्ये लंपीचा प्रसार झपाट्याने होत असल्याचा आरोप देहूतील शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना जनावरांना लस देण्यासाठी व औषधोपचार करण्याची मागणी केली जाते मात्र अधिकारी लस उपलब्ध नसल्याचे सांगत टाळाटाळ करत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला आहे.

याबाबत पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लसीकरण पूर्ण झाले असून लंपी आटोक्यात येईल असे साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; आखाती युद्ध पुन्हा भडकणार?

cockroach janata party : भेटूया पुण्यात, जय महाराष्ट्र! अभिजीत दीपकेची घोषणा; कॉकरोच जनता पार्टी करणार पुण्यात आंदोलन

Maharashtra News Live Update: मिरजगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? उद्धव ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा?

LPG गॅस सबसिडीच्या नियमात मोठा बदल; अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून ४ वर,उज्ज्वला लाभार्थ्यांना झटका

SCROLL FOR NEXT