tiwasa, farmers, amravati news saam tv
ऍग्रो वन

Farmers Protests : सडलेल्या संत्र्यांचा हार गळ्यात टाकून तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांचे आंदोलन

फळ पिकांचे माेठे नुकसान हाेऊन देखील तिवसा तालुक्यातील शेतक-यांना मदत मिळालेली नाही.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Farmers Protests : अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पूर्णपणे गारद झालेला आहे. जुलै ते ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आंबिया संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली.

तिवसा तालुक्यातील 22 हजार हेक्टर वर असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने आज तिवसा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी (farmers) शेतातील खराब झालेले संत्री आणून व त्या संत्र्याचे हार गळ्यात टाकून तिवसा तहसीलदाराला निवेदन दिले.

यावेळी आंदाेलकांनी राज्य सरकारच्या (maharashtra government) विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जसबिर ठाकूर म्हणाले गेल्या चार वर्षांपासून संत्र्याचे नुकसान झाले आहे. फळ पिकांचे माेठे नुकसान हाेऊन देखील तिवसा तालुक्यातील शेतक-यांना मदत मिळालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

5 Uses of Used Tea Powder: चहा केल्यानंतर उरलेली चहापावडर फेकून देताय? जाणून घ्या तिचे हे 5 जबरदस्त फायदे, घर होईल चकाचक!

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सभेत हसन मुश्रीफ-सतेज पाटील यांच्यात टोलेबाजी

SCROLL FOR NEXT