Farm संजय तुमराम
ऍग्रो वन

शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग! पारंपरिक पिकांना फाटा देत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड

डॉ. बन्सोड यांनी चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथे औषधी पिकांसह विविध उत्पादने देखील तयार केली आहेत.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

चंद्रपूर - जिल्हयातील डॉ. गजानन बन्सोड नामक प्रगतशील शेतकऱ्याने (Farmer) वेगळी वाट निवडली आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी आयुर्वेदिक वनौषधींची लागवड केली आहे. जंगल आच्छादित चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे नगदी पिकांचा नवा पर्याय गवसला आहे. डॉ. बन्सोड यांनी चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथे औषधी पिकांसह विविध उत्पादने देखील तयार केली आहेत.

चंद्रपूर जिल्हा म्हणजे धान, सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके घेणारा जिल्हा. जिल्हयातील या पारंपरिक पिकांमध्ये कष्ट जास्त आणि मिळकत कमी, हे अगदी ठरलेले सूत्र. त्यातही वन्यप्राण्यांच्या नुकसानीतून ही पिके बचावली तर ठीक, नाही तर नुकसान पाचवीला पुजलेले. अशा विषम परिस्थितीत चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील डॉ. गजानन बन्सोड या प्रगतशील शेतकऱ्याने आयुर्वेदिक वनौषधींची लागवड करण्याचा अभिनव प्रयोग केलाय. चिमूर येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ. गजानन बनसोड यांच्याकडे ८ एकर वडिलोपार्जित शेती आहे.

हे देखील पहा -

मात्र जंगलालगत असलेल्या या शेतात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे धान आणि तूर यासारखी पिके फायदेशीर ठरत नव्हती. त्यामुळे डॉ. बनसोड यांनी कोरफड, काटेकोहळे, शतावरी, पांढरी हळद, महाभृंगराज, अनंतमूळ आणि कचोरा यासारख्या आयुर्वेदिक वनौषधींची लागवड केली. या पिकांची खते, कीटकनाशके आणि निगा राखण्याचा जास्त खर्च येत नाही. सोबतच या पिकांना वन्यप्राण्यांपासून कुठलाच त्रास होत नाही. पारंपरिक पिकांपेक्षा या औषधी पिकांनी त्यांना लाखोंचा नफा मिळवून दिला आहे.

डॉ. बनसोड यांनी या आयुर्वेदिक वनौषधींमध्ये शेवग्याची लागवड करून आपला उत्पादन खर्च देखील कमी केलाय. डॉ. बनसोड यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला आवर्जून भेट देतात. कृषी विभागाने देखील त्यांच्या या अभिनव प्रयोगाचे कौतुक केले आहे.

मागील चार वर्षांपासून हा प्रयोग सुरू असून, त्यांनी उत्पादित केलेल्या वनौषधींवर प्रक्रिया करून अनेक आयुर्वेदिक औषधी व सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचा प्रकल्प देखील त्यांनी सुरु केलाय. त्यांच्या या उत्पादनाची उलाढाल आता २५ लाखांच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे त्यांचा हा अभिनव प्रयोग पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श निर्माण करित आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

SCROLL FOR NEXT