ढोबळी मिर्ची पिकवणारं गाव! बीड जिल्ह्यात शेतकरी बनत आहेत लखपती विनोद जिरे
ऍग्रो वन

ढोबळी मिर्ची पिकवणारं गाव! बीड जिल्ह्यातील शेतकरी बनत आहेत लखपती

दुष्काळी बीड जिल्ह्यात (Beed District) सततच्या नापिकीमुळे, आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आपण पाहिल्या असतील.

विनोद जिरे

बीड: दुष्काळी बीड जिल्ह्यात (Beed District) सततच्या नापिकीमुळे, आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आपण पाहिल्या असतील. मात्र आज आम्ही आपल्याला, या दुष्काळी बीडमधील असं एक गाव दाखवणार आहोत, ज्या गावातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत, आधुनिक शेतीची कास धरली आहे. ही आधुनिक शेती करत असतांना एका गावाला चक्क 'ढोबळी पिकवणारं गाव' म्हणूनचं ओळख पडली आहे. जाणून घेऊयात आधुनिक शेतीची कास धरून ढोबळी पिकवणाऱ्या या गावात कोरोना काळातही शेतकरी कसा होत आहे लखपती.

ही कहाणी आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असणारं दासखेड गावाची. अशोक आरगडे यांना एकूण साडेपाच एक्कर शेती आहे. त्यापैकी दोन महिन्यांपूर्वी 1 एक्करमध्ये त्यांनी ढोबळी मिर्चीची लागवड केली होती. त्यांना आतापर्यंत 1 लाख रुपये खर्च उत्पादन घेण्यासाठी आला. तर याचं उत्पन्न साडेपाच लाखाच्या घरात आहे. ड्रीपद्वारे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी त्यांना आई आणि पत्नी मदत करत आहेत.

शेतकरी अशोक आरगडे यांच्या पत्नी म्हणाल्या, की या अगोदर आम्ही कापूस, सोयाबीन लावत होतो. मात्र ते काही परवडत नव्हतं. त्यानंतर माझ्या पतीने ही आधुनिक शेती करायला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यापूर्वी शेतीची मशागत करुन या ढोबळी मिरचीची लागवड केलेली आहे. याला बराच खर्च होतो, मात्र त्याचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे. ही मिरची घेऊन जाण्यासाठी व्यापारी शेतात येतात जर आले नाही तर नागपूर, मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत ही मिरची आम्ही पाठवत आहोत. या आधुनिक शेतीतून आमचा मोठा फायदा होत असून मुलांचे शिक्षण देखील चांगल्या स्वरूपात पूर्ण होत आहेत. असा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत साधारण 15 टन मिर्ची बाजारात गेली आहे. त्याचे उत्पन्न सरासरी 3 लाख झालेला आहे. तर आणखीन 15 टन ढोबळी निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखीनही तीन लाखाचं उत्पन्न यातून निघू शकतं. अशा स्वरूपाची आधुनिक शेती जर शेतकऱ्यांनी केली. तर मला वाटतं शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही. असं देखील शेतकरी अशोक आरगडे म्हणाले.

तर याविषयी अशोक आरगडे सांगतायत, की गेल्या 4 वर्षांपासून या आधुनिक शेतीची कास धरली होती. त्यावेळी केवळ 2-4 शेतकरीच असं ढोबळी मिरचीचे उत्पादन घेत होते. मात्र त्यानंतर आम्ही इतर शेतकऱ्यांना प्रवृत्त करून आधुनिक शेती करण्यास भाग पाडलं. त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. याचा फायदा म्हणजे यंदा जवळपास 40 ते 50 शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केली असून गावात जवळपास 70 एक्करवर या ढोबळ्या मिरचीची लागवड केलेली आहे. ही ढोबळी आम्ही मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, संगमनेर, लातूर या भागात पाठवतो. त्याचबरोबर अनेक व्यापारी गावात येऊन देखील ढोबळी मिर्ची घेऊन जातात.

दरम्यान दुष्काळी बीड जिल्ह्यात आता शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत आहेत. यामुळं त्यांचा उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. अशोक आरगडे हे एकचं शेतकरी नाहीत की ते ढोबळी मिर्चीच्या माध्यमातून दोन महिन्यात लखपती झाले आहेत. गावातील असे अनेक शेतकरी आहेत, की जे कोरोणा काळातही मेहनत आणि जिद्दीच्या बळावर आधुनिक शेती करत लखपती झाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यासह ढोबळी पिकवणाऱ्या या गावचा आदर्श इतर गावातील घ्यायला हवा. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT