लोवर वर्धा धरणाचे बँक वॉटर शिरले शेतात; संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको सुरेन्द्र रामटेके
ऍग्रो वन

लोवर वर्धा धरणाचे बँक वॉटर शिरले शेतात; संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांच्या शेतात गेल्यामुळे हाताशी आलेले शेतकाऱ्यांचे पीक सडून गेले आहे.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : लोअर वर्धा धरणातील बॅक वॉटर शेतकऱ्यांच्या शेतात (Farmers) गेल्यामुळे हाताशी आलेले शेतकाऱ्यांचे पीकं सडून गेली आहेत त्यामुळे शेती पिकांवर 80 टक्के खर्च झाला आहे तो तर पाण्यात गेलाच पण मुलांच्या शिक्षणाची फी आणि जगण्यासाठी लागणारा खर्च करावा कुठून हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रोहना चौरस्त्यावर रास्ता रोको करीत पुलगाव - आर्वी मार्ग (Pulgaon - Arvi Road) बंद केला आहे केला आहे एक तासापासून वाहतूक खोळंबली आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांच्या जमिनी सरकारने अधिग्रहीत करून त्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवावे . शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी लोअर वर्धा प्रकल्पाचे प्रतिनिधी शेतकर्‍यांशी चर्चा करत आहेत. (Farmers in Arvi taluka block the road)

हे देखील पहा -

वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे धरण तुडूंब भरली आहेत आणि या भरलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावातील शेती संपूर्णपणे पाण्याखाली गल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या शेतीत 80 टक्के खर्च होऊन गेला आहे आता सोयाबीन काढणीला आला असतानाच संपूर्ण शेतात पाणीच पाणी झाले आहे.

यामुळे संतप्त झालेल्या आर्वी तालुक्यातील रोहणा यासह अन्य गावातील शेतकऱ्यांनी पुलगाव- आर्वी मार्ग रोहणा येथे रस्ता रोको केला आहे गेल्या एक तासापासून हा मार्ग बंद असल्यामुळे या मार्गावरील एसटी व वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे पावसातही शेतकरी आपला रास्ता रोको करत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Summer stomach problems: पोट बिघडण्यामागचं खरं कारण काय? उन्हाळ्यातील धोकादायक सवयींबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

Maharashtra News Live Update: संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर

Bollywood Famous Actor : डबल रोल नव्हे, प्रसिद्ध अभिनेत्याच्या एकाच चित्रपटात ६ भूमिका; बॉक्स ऑफिसवरही घातलाय धुमाकूळ

SCROLL FOR NEXT