nashik, yeola, farmers, onion, onion price saam tv
ऍग्रो वन

Nashik : कांद्याचा भाव गडगडला, शेतकरी हवालदिल; हाेळीला अग्निडाग समारंभ, निमंत्रण पत्रिका व्हायरल

कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये सरकार विषयी राेष निर्माण झाला आहे.

अभिजीत सोनावणे

Onin Price : महाराष्ट्रात (maharashtra) कांद्याचा (onion) भाव घसरला आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी (farmers) हवालदिल झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात कांद्याला दर मिळावा यासाठी शेतक-यांसह विविध राजकीय पक्ष बाजार समिती, रस्त्यांवर उतरुन आंदाेलन (aandolan) छेडत आहेत. आता तर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक (nashik) जिल्ह्यात कांद्याची हाेळी (holi) करण्याचा निर्धार शेतक-यांनी केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे यांच्या कांद्याच्या अग्निडाग समारंभाची निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल हाे त आहे. हा समांरभ मातुलठाण (नगरसुल - मातुलठाण राेड (ता. येवला, जिल्हा नाशिक) येथे आयाेजिला आहे. होळीच्या दिवशी हाेणा-या या संमारंभात शेतकरी कांद्याची होळी करणार आहेत.

लग्न पत्रिकेसारखी काढलेल्या समारंभाच्या पत्रिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय आराेग्य मंत्री हे उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांच्या आशिर्वादाने कार्यक्रम संपन्न हाेणार असल्याचे म्हटलं आहे. एकंदरीतच कांद्याच्या दरासाठी आता महाराष्ट्रात शेतक-यांचे आंदाेलन पेटणार असे चिन्ह आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Tourism: पार्टनरसोबत ठिकाणी फिरायला जायचंय, मग कर्नाटकमधील 'या' ठिकाणी नक्की जा

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT