Lumpy Disease Saam tv
ऍग्रो वन

Lumpy Skin Disease : बारामतीत जनावरांचा बाजार सुरु, आमच्याकडे का नाही ? शेतकरी संघटना आक्रमक

शेतक-यांसह व्यापारी देखील बाजार सुरु करा अशी मागणी करत आहेत.

विजय पाटील

Lumpy Skin Disease : लम्पी आजारामुळे गेले चार महिने झाले जनावरांचा बाजार बंद केला आहे. शासनाने महाराष्ट्रात (maharashtra) लम्पी आजाराच प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी जनावरांचे बाजार बंद ठेवले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा मोठा बाजार हा सांगलीतील मिरजेतील दुय्यम बाजार समितीत भरणारा बाजार समजला जातो. (Maharashtra News)

हा बाजार बंद असल्याने महाराष्ट्रसह कर्नाटक (karnataka) या राज्यांतील गाई, म्हैशी, बकरी पालन जोड धंदा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार बंद असल्याने बाजारात होणारा कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे.

या बाजारावर अवलंबून असलेल्या व्यापारी, चारा विक्रिते, टेंपो चालक यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारने वडगाव बारामती या ठिकाणचे म्हशीचे बाजार सुरू केले आहेत. या धर्तीवर मिरजेचाही म्हैस बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महादेव कोरे यांनी केली आहे. (Tajya Batmya)

शासनाने म्हैस बाजार जर सुरू केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी आणि शेतकरी संघटनेने दिला आहे. यावेळी महादेव कोरे (शेतकरी संघटना जिल्हााध्यक्ष) तसेच महंमद मनेर (व्यापारी) यांनी देखील बाजार लवकरात लवकर सुरु व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT