Amravati, nafed, farmers, swabhimani shetkari sanghatana saam tv
ऍग्रो वन

Swabhimani Shetkari Sanghatana : ...अन्यथा नाफेड चना खरेदी केंद्र पेटवून देणार : 'स्वाभिमानी' चा इशारा (पाहा व्हिडिओ)

शेतकऱ्यांना लेखी हमीची मागणी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अमर घटारे

Amravati : आजपासून नाफेड (nafed) चना खरेदीच्या नोंदणीला सुरुवात झाली. अमरावतीच्या (amravati) धामणगाव रेल्वेतील नाफेड केंद्राबाहेर नोंदणी करिता शेतकऱ्यांनी (farmers) गेल्या २४ तासापासून नोंदणी केंद्राबाहेर रांगा लावल्या. मात्र अचानक केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने तारांबळ उडाली. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया केंद्राला बंद करावी लागली. या निर्णयामुळे केंद्राबाहेर एकच गाेंधळ उडाला.

अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाली हाेती. २४ तासांपासून शेतकरी रांगा लावून हाेते. शेतकऱ्यांच्या गर्दीने नाफेड केंद्राची अक्षरक्ष: तारांबळ उडाली. (Breaking Marathi News)

पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवावा लागला. अचानक गर्दी वाढल्याने नोंदणी बंद करावी लागली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रोश केला. शेतकऱ्यांच्या वाढत्या आक्रोशामुळे नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मारोती बोकडे (व्यवस्थापक खरेदी विक्री सोसायटी ( नाफेड नोंदणी केंद्र) यांनी दिली. त्यामुळे आता चना खरेदी येता दाेन मार्च पासून होईल.

अचानक नोंदणी रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आक्रोश केला. जय जवान जय किसानने नारेबाजी करीत प्रशासनावर रोष व्यक्त केला. नाफेड केंद्राने नोंदणी प्रक्रिया सुरू करावी अथवा शेतकऱ्यांना लेखी हमी द्यावी या करिता नाफेड केंद्राबाहेर शेतक-यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात असल्याचा आरोप चेतन परडखे यांनी केला. खुल्या बाजारात शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला असता, तर ही वेळ शेतकऱ्यांवर आली नसती. गुरुवारी नोंदणी न झाल्यास नोंदणी कार्यालय पेटवून देणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) चेतन परडखे यांनी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: एसटी बस -दुचाकीची समोरासमोर धडक, २ जण ठार

Sambhajinagar News : बनावट विदेशी मद्य तयार करणाऱ्या एकास घेतले ताब्यात; १३ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Maharashtra News Live Updates: राज्यभरात आज प्रचाराचा सुपर संडे

Viral Video: एकीकडे तरुणींची जोरदार कुटाकुटी, दुसरीकडे काका फक्त पाहतच राहिले; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Tamannaah Bhatia: तमन्नाच्या अदा पाहून पोरं झाली फिदा

SCROLL FOR NEXT