nashik, onion price, laslagoan apmc, onion, farmers aandolan saam tv
ऍग्रो वन

Nashik : नाशकात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकरी घुसले, ठिय्या मांडत कांदा भाकर आंदाेलनास प्रारंभ

आज सकाळपासून लासलगावात देखील शेतक-यांनी आंदाेलन छेडले आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik : कांद्याचा दर (onion price) सातत्याने घसरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आज नाशकात (nashik) कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (farmers) जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसून आंदोलन छेडले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जमिनीवर बसून कांदा (onion) भाकरी खाऊन सरकारचा निषेद नाेंदविला.

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. कांद्याला चांगला भाव मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. (Breaking Marathi News)

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जमिनीवर बसून शेतकऱ्यांकडून कांदा भाकरी आंदोलन करण्यात येतंय. मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यसरकारने कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

कांद्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान कांद्याला प्रति क्विंटल 3 हजार रुपये भाव किंवा दीड हजार रुपये अनुदान देण्याच्या मागणी लासलगाव येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरेंचा धारावी कोळीवाडा दौरा

Tendulkar Family : तेंडुलकर कुटुंबाची विरारमध्ये नवी रिअल इस्टेट खरेदी

Shocking : ४ वर्षीय मुलीला बापानं नदीपात्रात फेकलं, नंतर स्वत: उचललं टोकाचं पाऊल

तारीख पे तारीख ! Mumbai-Goa highway बनणार कधी? राज्य सरकारकडून नवी डेडलाईन

Nashik News: नाशिकमधील कपालेश्वर मंदिरात दानपेटीवरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT