crop insurance saam tv
ऍग्रो वन

Saam Impact: सरकारला घ्यावी लागली साम टीव्हीच्या 'त्या' बातमीची दखल, शेतकऱ्याला मिळाला न्याय

त्यानंतर मंत्री विखे यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या सूचना केल्या होत्या.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Shirdi News : नगर जिल्ह्यात केलवड गावातील सावळाराम गमे या शेतकऱ्याच्या खरीप पिकाचे शंभर टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीने प्रतिगुंठा ५ रुपयां प्रमाणे १४०६ रुपयांची रक्कम जमा केली होती. साम टीव्हीने शेतकऱ्याच्या बांधावर जात या विषयाला वाचा फोडली होती. 'विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा' आशा आशयाचे वृत्त साम टीव्हीने प्रसारित केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या विमा कंपनीने गमे या शेतकऱ्याच्या (farmer) खात्यावर ३० हजार रुपये जमा केले. (Maharashtra News)

राहाता तालुक्यातील केलवड येथील सावळाराम गमे यांच्या २ हेक्टर ६१ गुंठे या क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी गमे यांना प्रति गुंठा ५ रुपये प्रमाणे अवघे १४०० रुपये मिळाले होते.. साम टिव्हीने 'विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा' अशा आशयाचे वृत्त प्रसारित केल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विमा कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे मान्य केले.

त्यानंतर मंत्री विखे यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याच्या सूचना केल्या होत्या. कृषी विभाग आणि पीक विमा (crop insurance) कंपनी यांनी तात्काळ पावले उचलत दुसऱ्या टप्प्यात गमे यांच्या खात्यात ३० हजार रुपये जमा केले.

राहाता तालुक्यातील इतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४ कोटी ३० लाख रुपयांचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. सावळेराम गमे यांची व्यथा मांडत साम टिव्हीने शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्याने हजारो शेतकऱ्यांना पीक विम्याचा योग्य न्याय मिळाला याबद्दल शेतक-यांनी 'साम' चे आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT