farmer shashikant naik from kudal sindhudurg earns 8 lakhs from watermelon farming  saam tv
ऍग्रो वन

Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! कोकणात कलिंगड शेतीतून मिळविले लाखाेंचे उत्पन्न; वाचा नाईकांची यशाेगाथा

कष्ट मेहनत आणि जिद्द या जीवावर शशिकांत नाईक यांनी प्रयाेग यशस्वी करून कलिंगड लागवडीतून चांगले उत्पन्न मिळविले आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

आज तरुणाई शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागल्याच चित्र आपणास सर्रासपणे पाहायला मिळतं. कुडाळ तालुक्यातील वारंग तुळसुली बांबरवाडी या भागातील शशिकांत नाईक या युवकाने मात्र व्यवसायाची कास धरत लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवल आहे. नाईक यांनी अवघ्या चार महिन्यात कलिंगड लागवडीतून आठ लाखांचे उत्पन्न घेतले. नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या तरुणाईसाठी शशिकांत नाईक यांनी नवा आदर्श तयार केला आहे. (Maharashtra News)

घरची परिस्थिती गरीबीची त्यात कसेबसे बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं आणि शशिकांत नाईक यांच्या सुद्धा मनात कुठेतरी नोकरी करावी अशी इच्छा होती. छोटी मोठी नोकरी करून आठ ते दहा हजार रुपयात स्वतःचा खर्च आणि घर खर्च चालविणे त्याला मुश्किल होतं होत.

हताश न होता शशिकांतने आपली वडिलोपार्जित 15 एकर पडीक जमीन आहे. या जमिनीत काही तरी व्यवसाय करायचा हे मनात ठरवलं. या जमिनीवर मोठं जंगल वाढलेलं होतं. शशिकांतच्या डोक्यात कल्पना आली त्यांनी हे सगळं जंगल साफ करून घेतलं.

या जंगलात त्याने काही भागात काजू लागवड केली तर चार ते पाच एकरात कलिंगडाची लागवड केली. खरंतर शशिकांतने केलेल हा पहिलाच प्रयोग होता. त्यामुळे कितपत यश मिळेल याचा प्रश्न त्याच्या मनात सारखा घोंगावत होता.

कष्ट मेहनत आणि जिद्द या जीवावर शशिकांतने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्याने चार एकर क्षेत्रात कलिंगड लागवड केली. यावर्षी पहिल्याच प्रयत्नात त्याला या चार एकर मधून तब्बल आठ लाखाचे उत्पन्न मिळालं. त्याच्या कुटुंबाने सुद्धा त्याला यात चांगली साथ दिली त्यामुळे शशिकांतच्या या प्रयत्नांना यश मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश मिळते हे शशिकांत यानेन दाखवून दिले आहे. आपल्या गावातच अगदी घराच्या बाजूलाच शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न शशिकांतने मिळवले. शशिकांतने कुडाळ सारख्या ग्रामीण भागात केलेला हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य असा म्हणावा लागेल कारण नोकरी करून घर चालवणं आजच्या काळात कठीण झाल आहे. त्यापेक्षा शेतीकडे लक्ष दिल्यास त्यातून आर्थिक सुबत्ता येऊ शकेल हे शशिकांत नाईक याने दाखवून दिल आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Crime: विद्यार्थ्यावर कधी कार, तर कधी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अत्याचार, गोळ्याही द्यायची; मुंबईतील शिक्षिकेचे धक्कादायक कारनामे उघड

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

SCROLL FOR NEXT