महावितरणने वीज तोडली अन् पीक करपू लागलं; शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या! विनोद जिरे
ऍग्रो वन

महावितरणने वीज तोडली अन् पीक करपू लागलं; शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या!

स्वाभिमानीच्या पूजा मोरेंसह शेतकर्‍यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

विनोद जिरे

बीड : वीज कट केल्याने पीक वाळून चालली, या विवेचनातून कृष्णा गायके या 23 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून, महावितरणने केलेला खून आहे, म्हणुन महावितरणवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा. ही मागणी घेऊन गेवराईच्या महावितरण कार्यालयात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्यासह, शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

हे देखील पहा-

वीज कट केल्याने कृष्णा गायके या तरुण शेतकऱ्याने, आपले जीवन संपवले आहे. एवढे होऊन देखील MSEB ने त्या गावातील कृषी पंपाची वीज जोडून दिलेली नाही. अजून किती जणांचा बळी यांना लागणार आहे..? असे सवाल करत महावितरणावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे.

कृषी पंपाची वीज जोडणी तात्काळ करा, नसता वाळून चाललेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्यासह, निपाणी जवळका येथील शेतकऱ्यांनी, गेवराई येथील महावितरणच्या कार्यालयातच, ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT