Dhule News
Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: खरबूज गारपीटीमुळे उध्वस्त; दोन दिवसाच्‍या गारपीट लाखोचे नुकसान

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बुधवारी देखील संध्याकाळच्या सुमारास पुन्हा गारपीट झाली आहे. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी देखील गारपीट झालेली होती. दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या (Farmer) तोंडाशी आलेला घास हा हिरावला गेला आहे. (Letest Marathi News)

गारपीटमुळे (Dhule News) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी पुर्णतः हतबल झाला आहे. या गारपीटीमध्ये गहू, हरभरा, टरबूज, खरबूज व कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाळ्यामध्ये टरबूज व खरबूजाला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असते. दरम्‍यान टरबूज व खरबूज या पिकांना भाव देखील चांगला मिळत आहे. अशा परिस्थितीतच खोरी येथील सतीश बोरसे या शेतकऱ्याच्या शेतात लावलेले टरबूज व खरबूज हे पीक गारपिटीमुळे पूर्णतः उध्वस्त झाले आहेत.

लाखोचे नुकसान

काढणीला आलेल्या खरबूज व टरबूज या पिकाला काढणीपूर्वीच गारपिटीचा फटका बसल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना भाजपचा मोठा झटका

Parbhani News : विहिरीचे खोदकाम जेसीबीने; रोहयोच्या संतप्त मजुरांनी पंचायत समितीतच प्राशन केले किटक नाशक

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ, अटकेसाठी ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Aditi And Siddharth Engagement : अदिती-सिद्धार्थने ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला?, अभिनेत्रीने एका महिन्यानंतर केला खुलासा...

Maharashtra Politics: जाहिरातीतील पॉर्नस्टारवरून भाजप अन् ठाकरे गटात जुंपली; चित्रा वाघ यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT