Dhule Rain Saam tv
ऍग्रो वन

Dhule Rain : सततच्या पावसामुळे शेतात साचले पाणी; पिके सडण्याची भीती

Dhule News : धुळे जिल्ह्यामध्ये सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेती पिकाला देखील आता याचा फटका बसताना दिसून येत आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा फटका शेती पिकाला बसत आहे. दरम्यान आता मागील दोन- तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे शेतातील पीक सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

धुळे जिल्ह्यामध्ये सातत्याने पडत (Dhule Rain) असलेल्या पावसामुळे शेती पिकाला देखील आता याचा फटका बसताना दिसून येत आहे, शेतात देखील कपाशी त्याचबरोबर सोयाबीन या पिकांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे आता ही पीक सडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेले काही दिवस पावसाने पाठ फिरविली असल्यामुळे शेतकरी (Farmer) पावसाची वाट बघत होते. परंतु त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाने जोर सुरू असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  

शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर वाढीस लावलेल्या पिकांना आता अतिवृष्टीचा फटका बसू लागला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान पावसामुळे शेतात पाणी साचले असून याचा फटका आता शेती पिकाला देखील बसणार असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT