Shirpur News Saam tv
ऍग्रो वन

Shirpur News : शिरपूर तालुक्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा; पेरण्या खोळंबल्या

Dhule News : हवामान विभागातर्फे समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल; असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला होता

भूषण अहिरे

धुळे : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून राज्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या देखील केल्या आहेत. मात्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. परिणामी पेरण्या राखलेल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहेत. 

हवामान विभागातर्फे समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तसेच वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल; असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्या अनुषंगाने शेतकऱ्याने शेती मशागतीची संपूर्ण कामे मोठ्या लगबगीने आटोपली. मात्र शिरपूर तालुक्यामध्ये सुरवातीला पाऊस आला. मात्र नंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. 

शिरपूर तालुक्यामध्ये अद्यापही पेरणी लायक पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मान्सून पूर्व लागवड करण्यात आलेले पीक देखील कडक उन्हात कोमेजून जात आहेत. पीक जगविण्यासाठी अजूनही शेतकऱ्यांना पाणी भरावे लागत आहे. दरम्यान मान्सूनचा दमदार पावसासाठी बळीराजा प्रतीक्षा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Fraud: दुप्पट परताव्याचं आमिष भोवलं! 500 गुंतवणूकदारांना 100 कोटींचा गंडा, तिघांचा जामीन फेटाळला

Director Death: मराठी रंगभूमीवरील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ दिग्दर्शिका काळाच्या पडद्याआड, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण रणनीतीपुढे विरोधक फेल

माजलगाव तहसील कार्यालयासमोर भीषण अपघात; कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

भाजपमधील अंतर्गत कलह शिगेला; अवघ्या 24 तासातच नव्‍या शहराध्‍यक्षांना नियुक्‍तीला स्‍थगिती

SCROLL FOR NEXT