Soybean Saam tv
ऍग्रो वन

Soybean: बाजारपेठेत सोयाबीनची आवक घटली; भाव मिळतोय कमी

बाजारपेठेत सोयाबीनची आवक घटली; भाव मिळतोय कमी

भूषण अहिरे

धुळे : परतीच्या पावसामुळे गेल्या एक ते दीड महिन्यात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन (Soybean) पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी (Sakri) साक्री व दोंडाईचा (Dondaicha) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घटल्याचे दिसून येत आहे. (Tajya Batmya)

यंदा धुळे (Dhule) जिल्‍ह्यात अतिवृष्‍टी झाली आहे. यामुळे पावसाच्‍या पाण्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात काढणीच्या वेळेस आलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन काळी पडल्याने सोयाबीनचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे उत्‍पन्‍नात देखील घट झाल्‍याचे पहावयास मिळाले आहे.

सोयाबीनला भाव कमी

एकीकडे आसमानी संकटामुळे सोयाबीनचे नुकसान झालेले असताना दुसरीकडे सोयाबीन काळी पडल्यामुळे व्यापाऱ्यांतर्फे सोयाबीनला भाव कमी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेत सोयाबीन अद्यापही विक्रीसाठी आणली नसल्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची घट बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad Cholesterol Food: नसांना चिकटलेला घाणेरडा कोलेस्ट्रेरॉल बाहेर करण्यासाठी हे ४ पदार्थ नक्की खा

विधानसभेतला राडा भोवला, पडळकर अन् आव्हाड समर्थकांना तुरुंगवासाची शिक्षा|VIDEO

Border 2: सनी देओलची फौज 'बॉर्डर 2' साठी तयार; चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर

Women iron deficiency: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये आयर्नची कमतरता का असते अधिक? काय असू शकतात कारणं जाणून घ्या

Samuruddhi Kelkar Video: अवखळ हासरी, अल्लड लाजरी; समृद्धी केळकरला पाहून चाहते झाले खुश

SCROLL FOR NEXT