ऍग्रो वन

पिक वाचविण्यासाठी पिकांना डब्या डब्याने पाणी

पिक वाचविण्यासाठी पिकांना डब्या डब्याने पाणी

भूषण अहिरे

धुळे : ऑगस्ट महिना अर्धा उलटला तरीदेखील धुळे जिल्ह्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळेच पेरणी केलेले पिक वाया गेल्यानंतर दुबार पेरणी केलेल्या पीकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चोहा पद्धतीचा वापर करून पिकाला वाचविण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. (Dhule-news-no-rain-last-month-in-fistrict-farmer-crop)

धुळे जिल्ह्यातील शिरपूर त्याचबरोबर शिंदखेडा तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. येथील शेतकरी चांगलाच चिंतेत सापडला आहे. दुबार पेरणी करून जसे तसे वाचविलेले पीक देखील वाढ खुंटल्यामुळे येणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट शेतकऱ्यांना सहन करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीचा व मजुरीचा खर्च देखील निघणार की नाही; या चिंतेमध्येच शेतकरी सध्या व्याकुळ झाला आहे.

पीकांची वाढ खूंटली

बहुतांश ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे खत टाकून देखील पिकाला या खताचा कुठल्याही प्रकारे फायदा होत नाही. त्यामुळेच पिकाची वाढ देखील खुंटली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशहा चोहा पद्धतीचा वापर करून डब्ब्या डब्ब्याने रोपांना पाणी पुरवून जगण्याची वेळ आली आहे.

इतके करूनही उत्पन्नाचा

जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत पिकांना तक धरण्यासाठी व जगवण्यासाठी शेतकऱ्यांना अशा पद्धतीने रोपांना पाणी द्यावे लागत आहे. असं असलं तरी एवढ जिवापाड जपून देखील उत्पन्नामध्ये घट येणार असल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT