Lightning Strike Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike : कांदा चाळीवर कोसळली वीज; संपूर्ण कांदा जळून खाक, शेतकऱ्याचे नुकसान

Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील बारकू गिरासे असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातून काढणी करत शेतकऱ्याने कांदा चाळीत भरून ठेवला होता

भूषण अहिरे

धुळे : मागील दोन- तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे. या दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील आरावे शिवारात कांद्याच्या चाळीवर वीज कोसळून संपूर्ण कांदा जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

शिंदखेडा तालुक्यातील बारकू गिरासे असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातून काढणी करत शेतकऱ्याने कांदा चाळीत भरून ठेवला होता. कांद्याला भाव नसल्यामुळे या शेतकऱ्याने भाव मिळेल या आशेने हा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता. परंतु भाव वाढ होत नसल्याने व पावसामुळे कांदा (Onion) खराब होऊ नये यासाठी चाळीत साठवणूक करून ठेवला होता. 

साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळीवरच रविवारी संध्याकाळच्या सुमारास वीज कोसळली. ही वीज कोसळल्याने कांदा चाळीला आग लागली. यामध्ये संपूर्ण कांदा हा (farmer) शेतकऱ्याचा डोळा देखत जळून खाक झाला आहे. प्रशासनाने याची खबरदारी घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT