Dhule Cold Wave Saam tv
ऍग्रो वन

Dhule Cold Wave : शीतलहरींमुळे दुभत्या जनावरांवर परिणाम; दूध उत्पादनात घट होण्याची भीती

Dhule News : गेल्या कित्येक दिवसांपासून धुळ्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील तापमानात घसरण होऊन तापमान ४ अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. यामुळे धुळ्यातील तापमान ४ अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम हा धुळ्यातील तापमानावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे दुभत्या जनावरांवर या वाढत्या थंडीचा परिणाम होऊन त्यांच्या दूध देण्याच्या प्रक्रियेवर देखील याचा विपरीत परिणाम होऊन दुधाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. 

गेल्या कित्येक दिवसांपासून धुळ्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील तापमानात घसरण होऊन तापमान ४ अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे. यामुळे जनजीवनावर परिमाण झाल्याचे धुळेकर अनुभवत आहेत. आता या शीतलहरींचा परिणाम धुळेकरांवरच नव्हे; तर येथील दुभत्या जनावरांवर देखील परिमाण होण्याची शक्यता पशुवैद्यकीय विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. 

दूध उत्पादनावर परिणाम 
वाढत्या थंडीचा सामना जनावरांना देखील करावा लागत आहे. या वाढत्या थंडीमुळे दुभत्या जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे दुभत्या जनावरांच्या त्वचेवर पूरळ येऊ शकतात. तसेच गाई- म्हशींच्या शरीरातून दुध निघण्याच्या कासेवर वाढत्या थंडीमुळे तडे पडून रक्तस्राव त्याचबरोबर पु बाहेर निघण्याची शक्यता असते. त्यामुळे दुभत्या जनावरांची दूध देण्याची प्रक्रिया मंदावून त्याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. 

अशी करा उपाययोजना
दुभत्या जनावरांना गोठ्यातच बांधावे, त्याचबरोबर त्यांना थंड हवेचा त्रास होणार नाही; यासाठी गोठ्याला बाहेरून गोणपाट बांधून थंड हवा अडली जाईल याची काळजी घ्यावी. जनावरांचे अंग गोनपाटाने झाकावे. जेणेकरून गोणपाटमुळे त्यांच्या शरीरात ऊब निर्माण होण्यास मदत होईल. त्यानंतर गोठ्याच्या ठिकाणी हवा गरम राहील; यासाठी शेकोटी करावी. त्यामुळे जनावरांना थंडी जाणवणार व त्यांच्या शरीरावर थंडीचा परिणाम होणार नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT