Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

साम टिव्ही ब्युरो

चिमठाणे (धुळे) : सततची नापिकी, अवकाळी पाऊस, शेतीच्या माला योग्य भाव नसल्याने बॅंकेचे कर्ज कसे फेडले जाईल, या विवंचनेतून येथील (farmer) शेतकऱ्याने मंगळवारी (६ जून) सकाळी पावणेसहाच्या सुमारास (Dhule News) घराच्या छताला दोराने गळफास घेऊन जिवन यात्रा संपविली. त्र्यंबक राजधर पाटील (वय ४०) असे शेतकऱ्याचे नाव असून चिमठाणे गावशिवरातील गट क्रमांक ८६३ या क्षेत्रावर बँकेचा बोझा होता. (Live Marathi News)

अवकाळी पाऊस, नापिकी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने त्यांच्या राहत्या घरी सिलिंगला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. त्याला खासगी रुग्णवाहिकेने शिंदखेडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी मृत घोषित केले. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत चुलत भाऊ पंडित नथ्था पाटील याने शिंदखेडा (shindkheda) पोलिस ठाण्यात माहिती दिली. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील, दोन भाऊ ,पत्नी व एक मुलगा आहे.

दहा दिवसात तीन तरुणांचा मृत्यू

चिमठाणे येथील अभियंता प्रथमेश भीमराव धनगर या अविवाहित एकुलता एक तरुणांचा २८ मे रोजी अपघाती मृत्यू झाला. येथील रहिवासी व बाळदे (ता.शिरपूर) विद्यूत वितरण कंपनीच्या ३३/११ उपकेंद्र ऑपरेटर असलेला प्रवीण विजय गवते याने रविवारी (ता.४) सुकवद येथील सुलवाडे बॅरेजमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. आज येथील शेतकरी त्र्यंबक राजधर पाटील याने कर्जबाजारीपणामुळे फाशी घेऊन आत्महत्या केली. दहा दिवसात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावर जणू मोठे संकट आले की असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT