Dhule News Rain Alert Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: जिल्‍ह्यात रात्री रिमझिम पाऊस; नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्‍न

जिल्‍ह्यात रात्री रिमझिम पाऊस; नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्‍न

भूषण अहिरे

धुळे : हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार धुळे जिल्‍ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्‍यरात्रीनंतर (Dhule News) जिल्‍ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस (Rain) झाला असून आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. (Live Marathi News)

हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची दाट शक्यता आहे. १४ मार्चपासून पुढील तीन ते चार दिवस उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे, त्याचबरोबर धुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देखील हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे, त्यानुसार सकाळपासून ढगाळ वातावरण बघावयास मिळत आहे.

गारपीटीची शक्‍यता

पाऊस येण्यापूर्वीच शेतकऱ्यांतर्फे आपली उर्वरित सर्व कामे ऊरकण्याची लगबग सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट होण्याची देखील शक्यता हवामान विभागातर्फे (Meteorological Department) वर्तविण्यात आल्यामुळे पावसाने कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांतर्फे त्याचबरोबर नागरिकांतर्फे सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

SCROLL FOR NEXT