Dhule News  Saam tv
ऍग्रो वन

Dhule Rain : समाधानकारक पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली; उत्पन्नावरही परिणाम होण्याची भीती

भूषण अहिरे

धुळे : जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटत आला तरी देखील धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे पेरण्या देखील कमी प्रमाणात झाल्या आहेत. तर जवळपास महिन्याभरापूर्वी पेरणी केलेल्या कपाशी पिकाची पाण्याअभावी वाढ देखील हवी त्याप्रमाणे झाली नसल्यामुळे याचा परिणाम येणाऱ्या उत्पन्नावर देखील होन्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

धुळे (Dhule) जिल्ह्यात गेल्या वर्षी देखील कमी प्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे शेतकऱ्यांचा गेल्या वर्षीचा हंगाम देखील वाया गेल्यामुळे यंदा तरी समाधानकारक पाऊस होऊन चांगले उत्पन्न हाती येईल; अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे. मात्र अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सुरवातीला पडलेल्या पावसानंतर पेरणी केली आहे. त्यांना पीक जगविण्याची चिंता लागली आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी पिकांची वाढ देखील खुंटली आहे. 

पाऊस नसल्याने अनेकांची पेरणी बाकी 

यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनने हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सुरवातीला चांगला (Rain) पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र काही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत थांबल्याने पेरणी केली नाही. यामुळे दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्याच्या पेरण्या बाकी राहिल्या आहेत. यामुळे आता तरी चांगला पाऊस पडेल व शेतशिवार फुलेल अशी आशा बळीराजाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ताजमहालाच्या तळाशी आहेत 50 विहिरी, तुम्हाला माहितीये यामागील रहस्य!

VIDEO : थेट घरात घुसून महिलेवर अत्त्याचार; सुसंस्कृत पुण्यात पोलिसांचा धाक संपला?

उपमुख्यमंत्र्याच्या पोरानं कायदा मोडला; RTO ने पकडला, ७ हजारांना भुर्दंड!

Marathi News Live Updates : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT