Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव; औषधी फवारणीने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ

Dhule News : जिल्ह्यातील तापमान ७ अंशापर्यंत गेले असताना अचानक वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढले आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र दोन दिवसांपासून धुके पडू लागले आहे. या वाढत्या धुक्यामुळे शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली असून यासाठी शेतकऱ्यांतर्फे औषध फवारणी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात आता वाढ झाली आहे. 


धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यातील तापमान ७ अंशापर्यंत गेले असताना अचानक वातावरणात धुक्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे याचा परिणाम गहू, हरभरा, कांदा या पिकावर होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान धुक्यामुळे पिकांवर होणाऱ्या रोगांपासून पिकाचे संरक्षण व्हावे; यासाठी शेतकऱ्यांतर्फे औषध फवारणी करून पिकांना वाचवण्याची धडपड शेतकऱ्यांची सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अधून मधून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून धुक्याचे देखील प्रमाण वाढले आहे. यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली असल्यामुळे या रोगांपासून आपल्या पिकांचे संरक्षण व्हावे; यासाठी शेतकऱ्यांतर्फे औषध फवारणी केली जात आहे.

फवारणीचा खर्च वाढला 

खरीप हंगामात अगोदरच नुकसान होऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागत आहे. दात धुके पडत असल्याने पिकांवर पडत असलेला रोग आटोक्यात आणण्यासाठी फवारणी करावी लागत आहे. यामुळे फवारणीचा खर्च वाढला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

SCROLL FOR NEXT