Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : पाऊस नसल्‍याने दुबार पेरणीचे संकट; शिरपूर तालुक्‍यातील गंभीर चित्र

पाऊस नसल्‍याने दुबार पेरणीचे संकट; शिरपूर तालुक्‍यातील गंभीर चित्र

भूषण अहिरे

धुळे : राज्‍यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. मात्र उत्‍तर महाराष्‍ट्रातील बहुतांश भागात अजूनही चांगला दमदार (Rain) पाऊस झालेला नाही. यामुळे शिरपूर (Shirpur) तालुक्यात अद्याप जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. (Latest Marathi News)

यंदा जुलै महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटला. परंतु दमदार पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागून राहिले आहे. पेरणी केलेले पीक येईल की नाही? याची देखील चिंता सतावत (Dhule News) आहे. अशीच काही परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर (Farmer) आता दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे.

पावसाच्‍या आशेने पेरणी

शिरपूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. जून महिन्यात पावसाच्या भरवश्यावर पेरणी केली होती. तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु, आता पाऊस नसल्‍याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT