Cotton Crop Saam tv
ऍग्रो वन

Cotton Crop : कपाशी पिकावर गुलाबी अळीचे आक्रमण; बोंडअळीच्या भीतीने शेतकरी हैराण

Dhule News : शेतकऱ्यांनी रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या जोरावर कपाशीची लागवड करत पीक घेतले. शेतकऱ्याने जेमतेम जगवलेल्या या कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळीने आक्रमण

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे शेतातून चांगले उत्पादन येण्याबाबत शक्यता कमी आहे. याच दरम्यान आता कपाशी पीक फुलावर आले असून यावर गुलाबो अळीने आक्रमण केले आहे. तसेच कपाशीची कैरी पक्की झाल्यानंतर त्यावर बोन्डअळी पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.  

धुळे (Dhule) जिल्ह्यात यंदा सुरवातीपासूनच चांगला पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या जोरावर कपाशीची लागवड करत पीक घेतले. शेतकऱ्याने जेमतेम जगवलेल्या या कपाशी पिकावर (Cotton Crop) गुलाबी बोंड आळीने आक्रमण केले आहे. सध्या फुलअवस्थेत असलेल्या कपाशी पिकावर बोंड आळीने आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अळी नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी आता फवारणी करू लागला आहे. 

गेल्या काही वर्षापासून बोंड अळीच्या सततच्या आक्रमणामुळे बऱ्याचशे (Farmer) शेतकरी इतर पिक लागवडकडे वळला आहे. तरी अजूनही अनेक शेतकरी कपाशी या पिकाची लागवड बऱ्यापैकी करीत असून, आता या कपाशीवर फुलावस्थेतच गुलाबी अळी दिसून आल्याने बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोंड अळीच्या प्रादुर्भावाला देखील मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागणार असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT