Shirpur News Saam tv
ऍग्रो वन

Shirpur News : मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्याने फिरविला रोटाव्हेटर

Dhule News : सततच्या हवामान बदलामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने तीन वेळा औषध फवारणी केली

भूषण अहिरे

धुळे : रब्बी हंगामात उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रावर मक्याची लागवड केली होती. पिकाची (Dhule) थोडी वाढ झाल्यानंतर त्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली. यामुळे (Farmer) शेतकऱ्याने तीन एकरातील मका पिकावर रोटावेटर फिरविला. (Breaking Marathi News)

शिरपूर तालुक्यातील भामपुर या परिसरात दीपक पाटील या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. सततच्या हवामान बदलामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्याने तीन वेळा औषध फवारणी केली. तरी देखील कुठल्याही प्रकारचा अळीचा प्रादुर्भाव कमी होत नव्हता. यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्याने हे पाऊल उचलत आपल्या तीन एकरातील मोठा खर्च करून जतन केलेल्या संपूर्ण मक्का पिकावर रोटावेटर फिरवला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खर्च गेला वाया 

महागाचे बियाणे घेऊन मका पिकाची लागवड दीपक पाटील यांनी केली होती. शिवाय लष्करी अळी पडल्याने त्यावर औषधी फवारणी देखील केली. मात्र तीन एकरावरील मका पिकावर रोटावेटर फिरवला आहे. यामुळे केलेला खर्च वाया गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT