बालाजी सुरवसे
धाराशिव : सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एखदा अडचणी सापडला आहे. सोयाबीनचे भाव दोनशे रुपयांनी उतरले आहेत. ऐकीकडे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असतानाचा सोयाबीनचे भाव मात्र कमी झाले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
धाराशिव जिल्ह्यात सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राकडे ३५ हजार ४०३ शेतकऱ्यांची विक्रीसाठी नोंदणी केली होती. यामध्ये केवळ १४ हजार २५७ शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी झाली. मात्र खरेदी केंद्राची मुदत संपल्याने एकट्या धाराशिव जिल्ह्यात २१ हजार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची खरेदी रखडली आहे. हे शेतकरी आता बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी दाखल होत आहेत. मात्र याठिकाणी सोयाबीनला कमी भाव दिला जात आहे. धाराशिवच्या कळंब बाजार समितीमध्ये सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार १०० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे.
नाफेड खरेदी केंद्रा बाहेर बारा दिवसांपासून शेतकरी मुक्कामी
बीड : नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील बारा दिवसांपासून माजलगाव येथील नाफेड केंद्राबाहेर शेतकरी मुक्कामी आहेत. तर खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या आजही लांब रांगा लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. बीड जिल्ह्यात ४४ हजार ७४४ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेड कडे नोंदणी केली होती. त्यातील केवळ वीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झालेले आहे.
उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होण्यापूर्वीच नाफेड केंद्र बंद झालेत. खरेदी केंद्र चालकांकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने शेतकरी आजही खरेदी केंद्राबाहेर सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. योग्य निर्णय घेऊन किमान इतर ठिकाणी तरी सोयाबीनला हमीभाव द्यावा; अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.