Vagitable Price Saam tv
ऍग्रो वन

Vagitable Price Hike : पालेभाज्यांचे दर कडाडले; आवक घटल्याचा परिणाम 

Dharashiv News : मुबलक पाणीसाठा असल्याने भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली. हिवाळ्यात शेतकऱ्यांनी लागवड केलेला भाजीपाला आता शेवटच्या टप्प्यात आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : उन्हाळ्याच्या दिवसात पालेभाज्यांची आवक मंदावत असते. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने बाजारात भाजीपाला कमी प्रमाणात येत आहे. यामुळे पालेभाज्यांचे दरात मोठी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. (Dharashiv News) धाराशिवमध्ये बहुतांश भाज्यांचे दर हे ६० रुपयांवर पोहचले आहेत. (Maharashtra News)

मुबलक पाणीसाठा असल्याने भाज्यांची आवक घटली आहे. परिणामी भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली. हिवाळ्यात शेतकऱ्यांनी लागवड केलेला (Vagitable) भाजीपाला आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात काढणी होईल, या पद्धतीने लागवड केली आहे. ज्यांच्याकडे मुबलक पाणी साठा आहे; त्याच (Farmer) शेतकऱ्यांनी हा भाजीपाला लागवड केला आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठवडी बाजारात काही दिवसांपूर्वी ३० रुपये किलोने मिळणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आता ३० रुपये पावकिलो या दराने विकल्या जात आहेत. तर टोमॅटोची लाली चांगलीच वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतर भाज्यांचे दर ६० रुपयांच्या जवळपास आहेत. धाराशिव आठवडी बाजारात भाजी खरेदीसाठी शहरासह अनेक गावातील नागरिक येतात. भाज्यांच्या दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT