Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : रब्बी हंगामातही विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना झटका; जिल्ह्यात केवळ ४ कोटीचीच नुकसान भरपाई

Dharashiv News : पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असते. यामुळे शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना सुरु केली आहे. यात पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : शेतकऱ्यांसाठी खरीप व रब्बी हंगामासाठी [पीक विमा उतरविला होता. मात्र खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही विमा कंपनीने शेतकऱ्यांना झटका दिला आहे. विमा कंपनीला शेतकरी हिस्सा व शासनाकडुन २१२ कोटी ३६ लाख रुपये देय असतानाही कंपनीने केवळ ११ हजार ४३ शेतकऱ्यांना ४ कोटी ८० लाख नुकसान भरपाई दिली आहे. 

पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत असते. यामुळे शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी (Crop Insurance) पीक विमा योजना सुरु केली आहे. यात पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते. मात्र शेतकऱ्यांना (Farmer) हि मिळणारी भरपाई उशिराने मिळत असून त्यात देखील कंपनीकडून शेतकऱ्याचे नुकसान केले जात असल्याचा अनुभव येत आहे. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यातील ७ लाख १९ हजार ६३३ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. यासाठी ४ लाख ८५ हजार २१८ हेक्टर क्षेत्रावरील विमा संरक्षित होता.  

१३ हजार ५९० शेतकरी वंचित 
तर कंपनीच्या (Crop Insurance Company) म्हणण्याप्रमाणे २४ हजार ६३३ पुर्व सुचना दिल्या असून यापैकी ११ हजार ४३ शेतकऱ्यांना ४ कोटी ८० लाख नुकसान भरपाई मिळाली आहे. तर १३ हजार ५९० शेतकऱ्यांना विमा कंपनीने मदतीपासून वंचित ठेवले आहे. वास्तविक १ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यानी विमा कंपनीला पुर्व सुचना दिल्याची शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहीती आहे. परंतु कपंनीकडुन शेतात नुकासीचे सर्वे करण्यासाठी कोणी फिरले नसल्याचा आरोप अनिल जगताप यांनी केला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहीले असून तक्रार निवारण समीतीची बैठक घेवुन शहानिशा शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT