Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Crop Loan : धाराशिव जिल्ह्यात २५ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात असते. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात पीककर्ज वाटपासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या २५ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. दरम्यान शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.    

खरीप व रब्बी हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांना बँकांमार्फत कर्ज (Crop Loan) उपलब्ध करून दिले जात असते. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जवळपास १ हजार कोटीच्या जवळपास पीक कर्जाचे लक्षांक आहे. धाराशिव जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडल्यामुळे शेतकरी (Farmer) वर्ग पेरणीच्या कामाला लागला आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज उपलब्ध होऊ शकलेले नाही. 

धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत २० ते २५ टक्के पीककर्ज वाटप झाले असुन सध्या जिल्ह्यात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. त्यामुळे तात्काळ या आठवड्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सुचना दिल्या. तरीही शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी किंवा ऑनलाईन तक्रार करावी; असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

SCROLL FOR NEXT