demand for harbhara increased in pandharpur saam tv
ऍग्रो वन

Pandharpur: थंडी वाढली, पंढरपूरात हरभऱ्याची भाजी खाऊ लागली भाव; गाठला चिकनचा दर

जीवनसत्व, पोषणमूल्य असलेल्या या भाजीला ग्राहकांकडून मोठी मागणी असते.

भारत नागणे

Pandharpur News :

पंढरपूरच्या बाजारात हरभऱ्याची भाजी चिकनच्या दरात विकली जात आहे. सध्या ५० ते ६० रुपये पाव किलो म्हणजे २०० ते २४० रुपये किलो दराने हरभऱ्याची (harbhara) विक्री होत आहे. बाजारात ब्रॉयलर चिकनचा (broiler chicken) दर २०० रुपये किलो आहे. एकंदरीतच दराची तुलना केली असता हरभऱ्याची भाजी मात्र चिकन पेक्षा ही भाव खाऊ लागली आहे. (Maharashtra News)

हिवाळ्यातील हंगामात बहुतांश शेतकरी हरभऱ्याची लागवड करतात. कडाक्याची थंडीमुळे पहाटे हरभऱ्याच्या पानांवर आंब पडली की मग भाजीसाठी हरभर्‍याचे कोवळे शेंडे खुडले जातात.

ही खुडलेली हरभऱ्याची भाजी ग्रामीण भागातील काही शेतकरी बाजारामध्ये विक्रीला घेऊन येत आहेत. फक्त थंडीच्या दिवसांत मिळणाऱ्या व भरपूर जीवनसत्व आणि पोषणमूल्य असलेल्या या भाजीला ग्राहकांकडून मोठी मागणी असते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भाजीची आवक कमी व मागणी जास्त असल्यामुळे या भाजीला इतर भाज्यांपेक्षा सर्वाधिक भाव मिळतो. एकंदरीतच दराची तुलना केली असता चिकन पेक्षाही हरभऱ्याची भाजी जास्त भाव खात असल्याचे चित्र पंढरपूरच्या बाजारात दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT